(भाग – ५) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel

सकाळी ७.३० वाजता पपु काकांनी आम्हाला गाढ झोपेतून उठवले, कसेबसे उठ्लोही. घाई घाईतच ब्रश, तोंड धुऊन फ्रेश झालो. सामानाची आवरा आवर केली. आता आम्हाला माचीवरील हॉटेल मध्ये नाश्ता करून खाली ठाकूरवाडीला जायचे होते. रात्रभर पडलेल्या पावसामुळे वातावरण बरेच ओलमय झाले होते. हिरवा रंग अधिक गडद झाला होता. ओढे दुधाडी भरून वाहत होते. धुक्यानी गडांचा माथा ताब्यात घेतला होता. धबधबे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झाले होते. इकडे आमचे पाय खूपच जड जड वाटत होते. शनिवारच्या प्रबळ पायपीटामुळे चालणे मुश्किल झाले होते. शेवरीच्या काठीवर संपूर्ण शरीराचा भार टाकत चालत होतो. तरीही मोहीम यशस्वी झाल्याची ख़ुशी सर्वांनाच होती.

Continue Reading →

10. July 2013 by Kiran Shinde
Categories: प्रबळगड | Prabalgad Trek | Tags: , , , , , , | 1 comment

(भाग – ४) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel

DSC02923

प्रबळगडाच्या माथ्यावरील निसर्गाचा आल्हादायक क्षण मनात साठवत होतो. बरोबर दुपारी १. १५ वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. काळे ढग वातावरण बदलवत होते, भराभर पावले टाकत सर केलेली खिंड उतरविण्यास सुरुवात केली. पाय लटलटत होते. हातातील शेवरीची काठीच आमच्यासाठी वरदान होती, तिचा आधार घेत अवघड खिंड सावकाश उतरत होतो. कठीन उतार बसत बसतच उतरत होतो.

Continue Reading →

09. July 2013 by Kiran Shinde
Categories: प्रबळगड | Prabalgad Trek | Tags: , , , , , , , | 4 comments

(भाग – ३) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel

(भाग – १) (भाग – २ )

ठाकूरवाडी गावातून ते प्रबळमाचीवर पोहचायला २ तास लागले होते. बरोबर सकाळी ११.०० वाजता राहण्याची सोय असलेल्या खोलीवर पोहचलो. खोलीच्या आजूबाजूला कौलारू घरे, जवळ जवळ १०-१२ असतील एकमेकाला चिकटून, चारी बाजूनी गर्द भल्या मोठ्या झाडांची संरक्षक भिंती, प्रत्येक घरात एक पाळीव रखवालदार, घरात लग्न सराई असल्यासारख्या गडबडीत चालणाऱ्या कोंबड्या, त्यांच्यावर आरवणारे मर्द कोंबडे… सुंदरच!!!

Continue Reading →

04. July 2013 by Kiran Shinde
Categories: प्रबळगड | Prabalgad Trek | Tags: , , , , , , , | 2 comments

(भाग – २ ) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel

भाग १ साठी येथे टिचकी मारा

वार शनिवार, २९ जून २०१३, सकाळी बरोबर ७.०० वाजता खुडबुड खुडबुड आवाजाने जाग आली. आमचा सिनिअर सिटीझन आधीच जागा झालेला. इकडे यंगिस्तान सकाळच्या गुलाबी थंडीत अजून चादरीखालीच. एका आवाजात पोर उठली. डोळे चोळत समोरच्या खिडकीत उभी राहताच, “आय शपत, आयला… ‘काय सोलेड सीन आहे’”. मी सुद्धा खिडकीतून डोकावले. आणि फोटो काढावाच लागला.

Continue Reading →

03. July 2013 by Kiran Shinde
Categories: प्रबळगड | Prabalgad Trek | Tags: , | 3 comments

(भाग – १ ) प्र..प्र..प्र..प्रबळगड । Prabalgad, Panvel

Prabalgad and Kalavandi Durg

Prabalgad and Kalavandi Durg

प्रशस्त.. प्रखर.. प्रभावशील..  असा हा प्रबळगड सर करण्याचा मनसुबा तयार केला. पनवेल पासून अवघे १३ किलोमीटर अंतरावर. हिरव्यागार रानवेलीत नटलेला, काळ्याकुट दगडांनी आच्छादलेला. त्यात वरुण राजाची कृपादृष्टी. हिरवेगार पठार, वाहणारे पाणी, तर कुठे साठलेले पाणी, वाट काढणारे झरे, उंचावरून कोसळणारे ते धबधबे. अशा या निसर्गाच्या कुशीत २ दिवस आम्ही १० जण होतो. त्याचाच अविस्मरणीय अनुभव शब्दात उतरविण्यासाठी आसुरलोय, माझा लेपटोप सुद्धा तयार आहे हा अनुभव टंकन करण्यासाठी… सुरु करतोय अगदी सुरुवातीपासून.

Continue Reading →

02. July 2013 by Kiran Shinde
Categories: प्रबळगड | Prabalgad Trek | Tags: , , , , , , , | 1 comment

भाग 2 – राजगड: Rajgad Trek

गाईड आकाश आपले काम चोखपणे करत होता. मंदिरातील ओलसरपणा कमी करून तो जमिनीवर अंथरण्यासाठी प्लास्टिक शीट घेऊन आला, तोपर्यंत राजगडावरील वरच्या बाजूस असणाऱ्या एका गावातून २ धनगर मंदिरातील दोन कोपरे अडवून बसले, हे धनगर राजगडावरील येणाऱ्या पाहुण्यांना चहा, कांदा पोहे,  पिटले भाकरी बनवून देत. दर शनिवार व रविवार या धनगरांचा  नेहमीचा धंदा. एकाचे नाव होते लक्ष्मण तर दुसरा गणेश. शरीरयष्टी अगदी किरकोळ, पण काटकपणा अंगात ठासून भरलेला, भारदस्त आवाज. सहज शिक्षण विचारले, अर्थातच शिक्षण शून्य होते. दोघेही सख्खे भाऊ, लग्न झालेले, दोघांना ४-४ मुले, मात्र दोघांच्या चुली वेगळ्या. सुसंस्कृत समाजाची कीड इथेही लागलेली… असो.. आपला विषय वेगळा आहे. बाहेर धुके, पाऊस जोर धरत होता. निसर्गप्रेमेंची संख्या वाढत होती. धनगर लक्ष्मण व गणेश, बोला चहा.. कांदा पोहे… गरम गरम पिटले भाकरी..बोला …. असे ओरडत आपला धंदा करण्यात व्यस्त झाले.

Continue Reading →

27. June 2013 by Kiran Shinde
Categories: राजगड | Rajgad Trek | Tags: , , , , , , , | 1 comment

भाग १ – राजगड: Rajgad Trek

Rajgad Fort

Rajgad Fort

गडांचा राजा राजगड.. बुलंद व बळकट गड, शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाची  उंची दाखवणारा गड. या  गडावर  जाण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबातील मावळे तयार झालो, मी (किरण), पपु काका, मामा, पी. एस. काका व त्यांचा मुलगा आकाश, ब्रम्हा काका,  सचिन, परेश, सौरभ, अजिंक्य तसेच आमचा गाईड आकाश.

Continue Reading →

25. June 2013 by Kiran Shinde
Categories: राजगड | Rajgad Trek | Tags: , , , , , , , | 1 comment

(भाग-२) सफर वैराडगडची

IMAG0584

दुपारचे जेवण उरकले होते, थोडा वेळ झाडाच्या सावलीत पहुडलो. बाटलीतले पाणी संपले होते, मग सागर, संतोष आणि बिगुल पाणी आणायला परत टाकी जवळ गेले. मी, साडू, शेखर, मयूर व डोंग्या पुढे जाण्याचे ठरवले. आता आम्हांला गडावरील चोर खिंडीतून खाली उतरून जायचे होते. चोर खिंड खूपच निमुळती व थोडी खोल होती. शूज घालून उतरणे शक्यच नव्हते, सर्वांनी शूज काढून दगडांच्या खाचेत पाय रोवत, शरीर दगडावर घासत हळू हळू उतरून खाली आलो. शूज घालून परत पायवाट पकडली. थोडेच अंतर गेल्यावर लक्षात आले डोंग्या कुत्रा वरच राहिला. त्याला खिंडीतून खाली कसा आणायचा याचा विचार करत, त्याला हाका मारू लागलो , हा बहाद्दर कडच्या वरून आम्हांला पहात होता. साडू व संतोष त्याला घेण्यासाठी खिंडीच्या मागील बाजूने पायवाटेने जावू लागले, डोंग्या पण त्याप्रमाणे पुढे पुढे येत होता. शेवटी डोंग्यानेच पुढाकार घेऊन वाट काढत त्यांच्या जवळ आला. तोपर्यंत आम्ही बाकी एका भल्यामोठ्या दगडाच्या कोरीत आराम करत बसलो.

Continue Reading →

26. September 2012 by Kiran Shinde
Categories: वैराडगड | Vairadgad | Tags: , | 1 comment

(भाग-१) सफर वैराडगडची

IMAG0392

नुकतेच गडांचा राजा राजगडला अविस्मरणीय भेट देऊन आलो होतो. आता सर करायचा होता वैराडगड. सातारा, भुईंज पाचवड येथून १५ कि.मी. अंतरावर भक्कम असा गड. मी, माझे साडू (संभाजी महामुलकर), सागर, शेखर, संतोष आणि मयूर या नवीन मावळ्यांची टीम तयार केली.

Continue Reading →

25. September 2012 by Kiran Shinde
Categories: वैराडगड | Vairadgad | Tags: , , , , , | Leave a comment

डेअरी करंदी | Satara

2012-08-26 15.12.10

२५ ऑगस्ट २०१२ रोजी डेअरी करंदी येथील निसर्गरम्य परिसरात मारलेला फेरफटका. याची निवडक छायाचित्रे.

Continue Reading →

25. August 2012 by Kiran Shinde
Categories: डेअरी करंदी | Satara | Tags: , , | 1 comment